• Download App
    Devendra Fadnavis दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातले लक्ष, जारी केला व्हॉटसॲप नंबर

    दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातले लक्ष, जारी केला व्हॉटसॲप नंबर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

    केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
    व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357
    #MahaHelpline

    मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गिरीश महाजन यांनी दुबईत अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये थांबू नका त्याऐवजी छोट्या हॉटेल्स मध्ये थांबा. सुरक्षित वेगळा आश्रय शोधा. छोट्या हॉटेल्स मध्ये थांबा. पैशांची काळजी करू नका आम्ही इथून मी पैसे पाठवतो, असे सांगितले.

    त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून स्टार एअरलाईनची दोन विमाने दुबईला पाठवण्याची व्यवस्था केली. दोन विमानांमधून अडकलेले भारतीय नागरिक भारतात परतणार आहेत.

    Chief Minister Devendra Fadnavis focuses on helping citizens stranded in Dubai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nagpur SBL : नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा 18 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा

    Jai Pawar : व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपले; जय पवारांकडून धक्कादायक दावा

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; कृषी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांकडूनही ‘क्लीन चिट’; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली