राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ होणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister devendra fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.Chief Minister devendra fadanvis
वर्ष 2016 मध्ये सुरू झालेल्या MAITRI 1.0 पोर्टलच्या तुलनेत या नवीन व्हर्जनमध्ये अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. 15 विविध विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यातील 100 सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बॉयलर्स, नगर विकास आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवांचा समावेश या पोर्टलमध्ये आहे.
उद्योग क्षेत्रातील सुलभता वाढवण्यासाठी येत्या काळात यामध्ये आणखी नवीन सेवा समाविष्ट केल्या जाणार असून, लवकरच या संख्येचा विस्तार 200 सेवांपर्यंत करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे राज्यातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना परवानगी व मंजुरीसाठी वेगवान, पारदर्शक आणि डिजिटल सेवा मिळणार आहेत. यावेळी मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव आणि उद्योग विकास आयुक्त उपस्थित होते.
Chief Minister and Deputy Chief Minister inaugurated MAITRI 2.0 portal
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi दिल्लीत आज मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात!!
- US : अमेरिकेने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांविरुद्ध कारवाई केली सुरू
- Fatehpur : फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; इंजिन रुळावरून घसरले
- राजीव गांधींच्या 21 व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली; मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!