नाशिक : महाराष्ट्रातल्याच काय, पण देशातल्या विरोधकांचा सगळ्या कारभारच उफराटा; मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर बाकी सगळ्यांचा ओला दुष्काळी दौरा!!, असला प्रकार महाराष्ट्रात घडला आणि घडणार आहे.
महाराष्ट्रात शारदीय नवरात्रात पावसाने धुमाकूळ घातला. मराठवाड्यात तर अति थैमान घातले. शेतात कापणीला पिके आडवी केली. अति मुसळधार पावसाने जमीन खरवडून गेली. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. छोट्या नद्यांना सुद्धा मोठे पूर आले. लाखो शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले. महाराष्ट्रात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली.
– मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आधी दौरे
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या सगळ्यांनी मराठवाड्याचा ओला दुष्काळी दौरा काढला. हे सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधांवर गेले. शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्र्यांना फडणवीस आणि शिंदे यांनी भेटून निवेदन दिले. केंद्राकडून भरघोस मदतीची मागणी केली. शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लावली.
पण त्यानंतर जागे झालेल्या विरोधकांनी सरकारी दौरे झाल्यानंतर मराठवाड्याचे दौरे काढले. उद्धव ठाकरे पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यात जाऊन आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ओला दुष्काळी दौरा जाहीर केला. त्यांच्या पाठोपाठ राहुल गांधींचाही ओला दुष्काळी दौरा जाहीर झाला.
– पूर्वी विरोधक करायचे आधी दौरे
पूर्वी महाराष्ट्रात आणि देशात अशी कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, की त्यावेळच्या विरोधी पक्षांचे नेते पहिल्यांदा दुष्काळी किंवा ओला दुष्काळी दौरा काढायचे. आपत्तीग्रस्तांच्या भेटी गाठी घ्यायचे. त्यांच्या वतीने सरकारकडे मोठ्या मागण्या करायचे विरोधकांचे दौरे झाल्यानंतर क्वचित प्रसंगी मुख्यमंत्री आणि राज्यात मधले मंत्री आपत्तीग्रस्त भागाचा दौरा काढायचे. ते एखाद दुसऱ्या ठिकाणी जाऊन यायचे. नंतर टप्प्याटप्प्याने थोडीफार मदत जाहीर करायचे त्यातली थोडीफार मदत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचायची.
पण सध्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आधी ओल्या दुष्काळी दौऱ्यावर गेले त्यांनी मंत्र्यांना कामाला लावले. प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठविले. तिथूनच अधिकाऱ्यांना आदेश काढायला लावले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट मदत पोहोचवायला सुरुवात केली. सरकारी दौरे सुरू असताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे हे सगळे नेते पुण्या – मुंबईतच बसून राहिले. पुणे मुंबईतच पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी फडणवीस सरकारकडे मोठमोठ्या रकमांच्या मागण्या केल्या. सरकारी दौरे झाल्यानंतर विरोधकांनी दौरे सुरू केले. त्यात आता राहुल गांधींची भर पडली. एवढे होऊनही उद्धव ठाकरे सोडले, तर बाकीच्यांचे दौरे अद्याप व्हायचे आहेत.
Chief Minister and Deputy Chief Minister, everyone has a wet and drought-like visit
महत्वाच्या बातम्या
- Ladakh : लडाख हिंसा- 4 ठार, 72 जखमी; राज्याचा दर्जा मागणाऱ्या आंदोलकांनी भाजप कार्यालयाला आग लावली
- नाव महागठबंधन, यात्रा मात्र वेगवेगळ्या; तरीही बिहारमध्ये बळकट भाजपला हरविण्याचा दावा!!
- State Government : महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा दिलासा; मृतांच्या वारसांना ४ लाख, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
- महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी संघासह सगळीकडून मदतीचा ओघ; मुख्यमंत्री निधीलाही भरघोस मदत