• Download App
    Chhagan Bhujbal Raises Doubts Over AAIB Report on Ajit Pawar Crash VIDEOS छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका, म्हणाले - विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असतेसत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका, म्हणाले – विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते

    Chhagan Bhujbal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chhagan Bhujbal सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Chhagan Bhujbal

    अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात झाला. तेव्हापासून या अपघाताविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील अनेक नेत्यांनी या अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी वेगवेगळे पुरावे व माहिती समोर आणून तपास यंत्रणांच्या नाकीनऊ आणलेत. त्यातच एएआयबीने आपल्या अहवालात अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी एका झाडाला धडकल्याचा दावा केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. छगन भुजबळ यांनीही नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवले आहे.Chhagan Bhujbal



    अजित पवारांचे विमान हवेतच कलंडून कोसळले

    छगन भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले नाही. विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते. पण तसे कोणतेही नुकसान दिसले नाही. विमान झाडावर पडल्याचे कुणी पाहिलेही नाही. विमान हवेतच कलंडले होते. त्यानंतर ते कोसळले. हे सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून येत आहे.

    आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा तिथे आम्हाला कुणीही विमान झाडाला धडकल्याचे सांगितले नाही. विमानतळावर अजित पवारांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. त्यापैकी कुणीही विमान झाडावर आदळल्याचा दावा करत नाही. त्यामुळे हे विमान झाडावर आदळल्याचे वाचून मलाही आश्चर्य वाटले. विमान झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान झाले असते. पण घटनास्थळी एकाही झाडाचे नुकसान झाल्याचे दिसले नाही, असे भुजबळ एएआयबीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले.

    पायलटच्या सीटवर झोपणे हा मुजोरपणा

    दुसरीकडे, अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह विमान उडत असताना पायलटच्या सीटवर बसून झोपल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांना या व्हिडिओविषयी छेडले असता त्यांनी तो व्हिडिओ अजित पवारांच्या विमानातील नसल्याचे स्पष्ट केले. जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ अजित पवारांच्या विमानातील नाही. त्यात मालक असता तर तो ही ठार झाला असता. पण ते चुकीचे आहे. फक्त पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर तो निष्काळजीपणा व मुजोरपणा आहे, असे भुजबळ म्हणाले.

    Chhagan Bhujbal Raises Doubts Over AAIB Report on Ajit Pawar Crash VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    विलीनीकरणाची चर्चा थांबविल्याचा जयंत पाटलांकडून लॉलीपॉप; शरद पवारांच्या उमेदवारीतला अडथळा दूर करण्याचा “डाव”!!

    Raj-Uddhav : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंमध्ये एकमत होईना; स्वीकृत नगरसेवक न मिळाल्याने मनसे नाराज

    राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??