• Download App
    छगन भुजबळ : कोरोना संकट दूर होऊ दे ; सप्तश्रृंगी चरणी केली प्रार्थनाChhagan Bhujbal: Let the Corona crisis go away; Prayers performed at the Saptashrungi i

    छगन भुजबळ : कोरोना संकट दूर होऊ दे ; सप्तश्रृंगी चरणी केली प्रार्थना

    राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी गडावरील मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली.Chhagan Bhujbal: Let the Corona crisis go away; Prayers performed at the Saptashrungi 


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गेले अनेक दिवस कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर होतं आणि अजूनही आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी गडावरील मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली.

    सध्या ही परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आपण पुन्हा सर्व गोष्टी सुरू करत आहोत. आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मंदिरे सुरू करण्यात आलेली असून राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना व्यक्त केली.



    काय म्हणाले छगन भुजबळ

    छगन भुजबळ म्हणाले की ,आज राज्यातील मंदिरे उघडली आहेत मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करूनच सर्वांनी दर्शन घ्यावे. महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच मात्र या संकटातून सावरण्याचे बळ शेतकऱ्यांना मिळो ही देखील प्रार्थना आज मी केली. त्याचबरोबर राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी देखील प्रार्थना आज मी केली .

    Chhagan Bhujbal: Let the Corona crisis go away; Prayers performed at the Saptashrungi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!