विशेष प्रतिनिधी
नाशिक : अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळ समर्थकांनी पुण्यात अजितदादांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केले. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा घामासान माजले. भुजबळ आणि अजितदादांचे वेगवेगळे समर्थक एकमेकांसमोर आले. गेले दोन दिवस भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या कार्यशैलीचे सगळे वाभाडे बाहेर काढले. अजित पवार + प्रफुल्ल पटेल + सुनील तटकरे यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या. Chhagan Bhujbal’s language of identity in Yewala
पण आज बुधवारी छगन भुजबळांची भाषा जरी अस्मितेची राहिली, तरी ती थोडीशी मवाळ झाली आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहून छगन भुजबळ यांनी भाषा तर अस्मितेची केली, पण त्याचवेळी आपण सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा सूचक इशारा देऊन टाकला.
छगन भुजबळांची पोस्ट अशी :
येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे ग्वाही दिली.
तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंध ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्यासोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, एल.जी.कदम, अर्जुन कोकाटे, डॉ.श्रीकांत आवारे, दिपक लोणारी, राजश्री पहिलवान,सुरेखा नागरे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, विनोद जोशी, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, दत्ताकाका रायते, विलास गोरे, शिवाजी सुपणर, अशोक नागरे, संजय पगारे, सचिन कळमकर, कैलास सोनवणे, बालेश जाधव, डॉ.प्रवीण बुल्हे, तानाजी आंधळे, मलिक मेंबर, मतीन अन्सारी, पांडुरंग राऊत, सर्जेराव सावंत, डॉ.वैशाली पवार, अनिल सोनवणे, बबन शिंदे, अशोक संकलेचा, अल्केश कासलीवाल, सोहील मोमीन, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Chhagan Bhujbal’s language of identity in Yewala
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal छगन भुजबळ म्हणाले- राष्ट्रवादीत अजितदादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, पूर्वी मला ठाकरे-पवार विश्वासात घ्यायचे
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- काँग्रेसला मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे, म्हणूनच 50%ची मर्यादा हटवण्याबद्दल बोलत आहेत
- भुजबळांचे बंड ते खातेवाटप अजितदादांच्या मर्यादा उघड; काँग्रेस पुढे चालली “दादागिरी”, भाजप पुढे गारद!!
- Kolkata rape-murder case, : कोलकाता रेप-मर्डरप्रकरणी डॉक्टरांचे 10 दिवस आंदोलन, माजी प्राचार्य घोषला जामीन देण्यास विरोध