नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही, त्यावरून चिडचिड करत छगन भुजबळ यांनी जहाँ नही चैना, वहाँ ही रहना!! वगैरे डायलॉगबाजी केली असली, तरी प्रत्यक्षात वयाच्या 77 व्या वर्षी छगन भुजबळ यांच्याकडे बंडाचे ऑप्शन्स तरी किती शिल्लक आहेत??, हा सवाल महत्त्वाचा ठरतो.
मंत्रिमंडळात स्थान दिले नाही म्हणून विजय शिवतारे, सदाभाऊ खोत किंवा अन्य आणखी काही चार-पाच नेते नाराज असल्याच्या बातम्यांनी माध्यमांमध्ये गर्दी केली, पण त्यात छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातमीने टॉप रँकिंग मिळवले. हे भुजबळ इतरांपेक्षा “हेवीवेट” नेते असल्याचे लक्षण आहे
छगन भुजबळ यांनी उघडपणे अजित पवारांनी आपल्याला कसे डावलले, राज्यसभेची ऑफर कशी दिली, वगैरे सगळे सांगून टाकले. आपल्याला जेव्हा राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा अजितदादांनी राज्यसभेवर जाऊ दिले नाही. उलट विधानसभा निवडणूक लढवा म्हणजे राज्यभरातले कार्यकर्ते जोमदारपणे काम करतील, असे सांगितले. म्हणून मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आता आठ दिवसांपूर्वी मला पुन्हा राज्यसभेची ऑफर दिली. पण मी ती नाकारली. कारण मी मतदारांशी प्रतारणा करणार नाही, असे भुजबळ यांनी नागपुरात स्पष्ट केले आणि ते नाशिक कडे निघाले.
छगन भुजबळ यांना अजितदादांनी कसे “खेळविले” हे भुजबळ यांनी उघडपणे सांगून अजितदादांची गोची केली हे खरे, पण वयाच्या 77 व्या वर्षी छगन भुजबळ यांच्याकडे बंडाचे ऑप्शन तरी किती शिल्लक आहेत??, हा सवालच आहे.
वास्तविक छगन भुजबळ यांना शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीने काही कमी दिले नाही. दोनदा उपमुख्यमंत्री केले. राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही सत्तेमध्ये असताना सतत मंत्री ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर “अन्याय” वगैरे झाल्याची भाषा जरी त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली, तरी ती वस्तूस्थिती नाही. छगन भुजबळ यांच्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे असे कितीतरी नेते आहेत, की ज्यांना छगन भुजबळ यापेक्षा कमी वर्षे मंत्रीपदे मिळाली. किंवा मंत्रीपदे मिळाली देखील नाहीत. त्यामुळे छगन भुजबळांवरचा “अन्याय” ही फक्त प्रपोगंडा करण्याची गोष्ट आहे, त्या पलीकडे काही नाही.
असे असले तरी छगन भुजबळ सर्वयाच्या 77 व्या वर्षी बंडच करणार असतील, तर ते जाणार कुठे?? शरद पवारांकडे पुन्हा जाऊन भुजबळांचा लाभ काय होणार?? अगदी भुजबळ एकटे नाही गेले आणि त्यांच्याबरोबर ओबीसी आमदारांचा एखादा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निघून गेला, तरी मूळात राष्ट्रवादी नावाची जी प्रवृत्ती आहे, ती फक्त सत्तेला चटावलेली आहे हे विसरून कसे चालेल?? मग छगन भुजबळ किंवा त्यांच्याबरोबरच एखादा छोटा मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेला म्हणून लगेच फडणवीस सरकार गडगडेल आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी नावाचा गट सत्तेवर येऊन भुजबळ यांना मोठे पद मिळेल ही शक्यताही दुरान्वये दिसत नाही.
“जरांगे फॅक्टर” थंड, मग…
तसेही छगन भुजबळाने आपल्याला मंत्री का केले नाही??, याचे खरे कारण जाता जाता का होईना पण सांगून टाकले. “जरांगे इफेक्ट”मुळे आपल्याला मंत्री केले नाही, असे ते म्हणाले. पण मूळात लोकसभा निवडणुकीत चाललेल्या “जरांगे फॅक्टर” विधानसभा निवडणुकीत चाललाच नाही हे सिद्ध झाले. याचा अर्थ जर “जरांगे फॅक्टर” जर थंड पडला असेल, तर मग “भुजबळ फॅक्टर” पुन्हा पेटवण्यात काय मतलब आहे??, असा जर विचार अजितदारांनी केला असेल, तर तो राजकीय दृष्ट्या चूक म्हणता येणार नाही.
त्यामुळे छगन भुजबळ यांनी कितीही जहाँ नही चैना, वहाँ नही रहना!! वगैरे डायलॉग मारून बंडाचे वगैरे संकेत दिले असले, तरी त्यांच्याकडे बंडाचे ऑप्शन्स फार थोडे आहेत. राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणे यापलीकडे ते फारसे काही करण्याच्या स्थितीत राहणार नाहीत, अशी “व्यवस्था” कदाचित अजितदादांनी आधीच करून ठेवली असेल, याचेच संकेत स्वतः भुजबळांच्या वक्तव्यातून आले आणि अजितदारांनी अद्याप तरी प्रतिक्रिया न व्यक्त करण्यातून आले!!
Chhagan Bhujbal has very limited options against mahayuti
महत्वाच्या बातम्या
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- Omar Abdullah: ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसचे उपटले कान, म्हणाले- EVMवर रडणे थांबवा, विश्वास नसेल तर निवडणूक लढवू नका!
- Ustad Zakir Hussainतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन; 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मान
- Danish Merchant : मुंबई पोलिसांनी दाऊदचा साथीदार डॅनिश मर्चटला अटक