नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी एन्ट्री केली. धनंजय मुंडे यांच्याकडे खाते त्यांना देण्यात आले. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळातला अजितदादांच्या कोट्यातला deficit पूर्ण भरला गेला. गेले काही महिने “अलग” पडलेल्या छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ओबीसींना न्याय मिळाला, असे भुजबळांच्या समर्थकांना वाटले.
पण त्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र त्याचे वेगळेच पडसाद उमटलेत. कारण छगन भुजबळ यांची फडणवीस मंत्रिमंडळात “एन्ट्री” म्हणजे राष्ट्रवादीच्या ऐक्याच्या प्रयत्नांमध्ये खोडा आणि जयंत पाटील + रोहित पवार यांच्या मंत्रिमंडळात येण्याचा मार्ग रोखला, असा याचा अर्थ काढला, तर त्यामध्ये फारसे काही वावगे ठरणार नाही.
शेवटी राष्ट्रवादीचे ऐक्य होणार तरी कशासाठी होते आणि ते करणार तरी कोण होते??, तर राष्ट्रवादीचे ऐक्य भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन आपापल्या संस्था, बँका, कारखाने आणि संघटना वाचवण्यासाठी होते. अजितदादांची राष्ट्रवादी वरची पूर्ण grip ढिल्ली करण्यासाठी होते, सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी होते. राहता राहिले जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या political adjustment साठी होते. थोडक्यात भाजपने अजितदादांना दिलेल्या सत्तेच्या तुकड्यात वाटा मिळवण्यासाठी होते.
अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्यात वाटा
पण छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एन्ट्रीमुळे अजितदादांना दिलेल्या सत्तेचा कोटा सध्यातरी भरला गेला. त्यामुळे इथून पुढे जयंत पाटील किंवा रोहित पवार यांना फडणवीस मंत्रिमंडळात adjust करायचे असेल, तर अजितदादांच्याच कोट्यातला मंत्री वगळावा लागेल. भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपापले कोटे alter करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भरणा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात करण्याची शक्यता फार धूसर आहे.
तसेही दोन्ही राष्ट्रवादीच्या ऐक्यची चर्चा स्वतः शरद पवारांनी सुरू करून देऊन माध्यमांच्या मार्फत त्याला राजकीय फोडणी दिली. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये त्याविषयी कुठली चर्चाच सुरू झाली नाही. काका पुतण्यांच्या एकीची चर्चा फक्त “पवार बुद्धीच्या” माध्यमांमध्ये आहे, अशी वक्तव्ये खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी केली. शरद पवारांनी हवेत सोडलेल्या फुग्याला त्यांनी टाचणी लावली होती… आणि आता तर त्या पुढची राजकीय कृती करून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात “एन्ट्री” देऊन राष्ट्रवादीचा कोटा पूर्ण केला. यातून खरं म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांना political signal दिला, की तुम्ही जरी माध्यमांमध्ये राष्ट्रवादीच्या ऐक्याच्या चर्चेची पुडी सोडून दिली असली, तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळातला राष्ट्रवादीचा कोटा भरला गेलाय. त्यामुळे तुमच्याबरोबर राहिलेल्या अनुयायांना सध्या तरी आमच्या कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. तेव्हा तुमचे तुम्हीच ठरवा ऐक्य करायचे की नाही!!
– मोदी + शाह काय करतील??
अर्थात हे सगळे जरी खरे असले, तरी केंद्रात बसलेल्या मोदी आणि शाह यांच्या political scheme मध्ये वेगळे काही असले आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात adjust करायचे असले, तर राज्यात ते कोणतीही उलटा पालट करू शकतात. तिथे देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांची “नीट” “समजूत” काढू शकतात. महायुतीची फेरमांडणी करू शकतात, पण काहीही झाले तरी महाराष्ट्रावर भाजपने निर्माण केलेली grip ते सोडणार नाहीत आणि ती आयती शरद पवारांच्या हातात देण्याची शक्यता नाही. त्यामुळे भुजबळांच्या एका एन्ट्रीने दोन्ही राष्ट्रवादींच्या ऐक्य चर्चेवर पाणी फेरले गेले आहे.
Chhagan Bhujbal entry in Fadnavis government, cracks in NCP intact
महत्वाच्या बातम्या
- Hong Kong : हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले; सिंगापूरमध्ये सतर्कता, कोविड रुग्णांमध्ये 28% वाढ
- Nirav Modi’ : फरार नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमध्ये फेटाळला; PNBची तब्बल 14,500 कोटींची फसवणूक
- भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याची अमेरिकेची धडपड; त्या पाठोपाठ सिंधू जल करारात ब्रिटनची लुडबुड!!
- Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची पहिल्यांदाच तालिबानशी चर्चा; पाकिस्तानचा दावा फेटाळल्याबद्दल आभार