विशेष प्रतिनिधी
मुंबई :Chandrashekhar Bawankule महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख, वार आणि ठिकाण निश्चित झाले असून शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्सही लवकर संपण्याची चिन्हे आहेत.Chief Minister
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सायंकाळी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून महायुती सरकारच्या शपथविधीची घोषणा केली. त्यानुसार महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे आता सरकार स्थापना करण्याच्या निर्णयाला वेग आला असून मुख्यमंत्री पदावरचा सस्पेन्स देखील लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ दरे या गावी असले तरी ते तिथून लवकरच मुंबईत परतून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीवारी करून मंत्रिमंडळातली नावे निश्चित करणार आहेत.
बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, शिंदे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदावर आडून राहिले, भाजप त्यांना गृहमंत्री पद देणार नसेल, तर ते दुसऱ्या कुठल्या शिवसेना नेत्याला उपमुख्यमंत्री पद देतील वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी चालवून घेतल्या. परंतु, शिवसेनेच्या कुठल्याही सूत्रांनी त्या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिला नाही.
The date, time, venue of the swearing-in ceremony of the grand alliance government is fixed, the suspense on the post of Chief Minister will also end soon!
महत्वाच्या बातम्या
- Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
- India China border भारत-चीन सीमेवर वसलेल्या गावांमध्ये स्थलांतर होणार नाही!
- Priyanka Gandhi : CWC च्या बैठकीत प्रियांका गांधींची बॅलेट पेपरवर निवडणुकीची वकिली; पण CWC च्या ठरावात ठाम उल्लेख टाळला!!
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला!