‘’जर तरच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला राष्ट्रवादीची मदत लागली तर तुम्ही घेणार का?’’ या प्रश्नावरही बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांचं एक राजकीयदृष्ट्या खळबळजनक असं ट्वीट समोर आलं आहे. या ट्वीटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्यासंदर्भात दमानियांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे. दमानियांच्या या ट्वीटवर आता खुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. Chandrasekhar Bawankules reaction on Anjali Damanias tweet about Ajit Pawar
छत्रपती संभाजीनगरात आय़ोजित पत्रकारपरिषदेत यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘’जर तरला काही अर्थ नाही. मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्यावर काही आपण टिप्पणी करण्यात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्यासारखं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालची वाट बघावी, तरीही जर तरला काही अर्थ नाही.
‘’१५ आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपा बरोबर जाणार’’ अंजली दमानियांच्या ट्वीटने चर्चांना उधाण!
याशिवाय, ‘’संपूर्ण बहुमताने भाजपा-शिवसेना युती सत्तेत आहे. मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रचंड काम करत आहेत. अर्थसंकल्पातून ज्याप्रकारे महाराष्ट्राला दिलं आहे, ते कुठल्याही सरकारने आतापर्यंत दिलेलं नाही. अस्वस्थ झालेला विरोधी पक्ष मात्र कपोलकल्पित बातम्या देऊन, आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण भाजपा-शिवेसना युती घट्ट आहे. हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे आणि हेच महाराष्ट्राने दिलेलं बहुमत आहे. त्यामुळे असं काही होणार नाही, जसं आपण समजत आहात.’’ असंही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
याचबरोबर जर तरच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला राष्ट्रवादीची मदत लागली तर तुम्ही घेणार का? यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी, ‘’मला नाही वाटत कुणाची गरज पडेल. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल, त्यावर शेवटी भाजपा-शिवसेना युती महत्त्वाची आहे.’’ असं उत्तर दिलं.
Chandrasekhar Bawankules reaction on Anjali Damanias tweet about Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
- ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
- लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर
- वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!