विशेष प्रतिनिधी
नागपूर: मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आहेत असे कौतुक ‘ सामना ‘ दैनिकाच्या अग्रलेखात करण्यात आले आहे. चांगल्या कामाचे कौतुक होणे महाराष्ट्राचे संस्कार आहेत. हेच महाराष्ट्रात अपेक्षित आहे, असे मत महसूल मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जात आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगल्या कामाचे कौतुक करणे हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत.
ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने केलेल्या याचिकेवर ते म्हणाले, निवडणूक आयोगाने यापूर्वीच लेखी उत्तर दिले आहे .त्यांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. पराभव स्वीकारून जनतेत गेले तर पुढच्या काळात समोर जाता येईल. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे की ईव्हीएमला दोष देणार नाही. काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर निघत नाही .
लाडकी बहिण योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला वळविले नाही असे स्पष्ट करताना बावनकुळे म्हणाले, कुठल्या हेडचा पैसा कुठेही डायव्हर्ट करता येणार नाही.निधीसाठी मोदी सरकार आमच्या सोबत आहे. डबल इंजिन सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अर्थतज्ञ मुख्यमंत्री, अजित पवार आमच्या सोबत आहेत
बीड प्रकरणावर बोलताना ते म्हणाले,,एकमेकांचा राजीनामा मागण्यापेक्षा तपासात सहकार्य अपेक्षित आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. अशी चर्चा करणे गरजेचे नाही. प्रकरणाचं तपास असेपर्यंत सहकार्य केले पाहिजे. एकमेकांचा राजीनामा मागण्यापेक्षा तपासात सहकार्य अपेक्षित आहे.
Chandrasekhar Bawankule’s opinion
महत्वाच्या बातम्या
- social media मुलांचे सोशल मीडिया अकाउंट पालकांच्या परवानगीने बनणार; कायद्याचा मसुदा 16 महिन्यांनंतर जारी
- पुण्यात सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालय, जागा उपलब्धतेसाठी माधुरी मिसाळ यांच्या सूचना
- मुंबईच्या धारावीत भीषण अपघात, टँकरची सहा कारला जोरदार धडक!
- Devendra Fadnavis : “अकेला देवेंद्र” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीस आता “ऍक्टिव्ह” दिसले; पण हा “ऍक्टिव्हिजम” नेमका कुठे??