विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मागील शनिवारी इंधन दरवाढीने उच्चांक गाठला होता. 35 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढले होते. त्यानंतर जवळपास प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलच्या दराने 100 री ओलांडली होती. या सर्व घटनेनंतर केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर सर्वच स्थरातून मोठी टीका करण्यात आली होती. तर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या गोष्टींबद्दल दोषी ठरवले आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील जनतेला इंधन वाढीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळी हिंगोलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
Chandrakant Patil’s allegations against Ajit Pawar, said Pawar is responsible for the fuel price hike in the state
या प्रकरणातील अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, जेव्हा १०० रुपये हा पेट्रोल-डिझेलचा दर असतो तेव्हा ३५ रुपये ही परचेस कॉस्ट (म्हणजेच खरेदी किंमत) असते. त्यातून काही सूट देता येत नाही कारण आपण काही लाख लीटर डिझेल पेट्रोल वापरतो. ५० पैसे जरी सूट दिली तरी केंद्र सरकारला विचार करावा लागेल. ६५ रुपयांमध्ये निम्मा कर केंद्राचा आणि निम्मा राज्याचा असतो. केंद्राच्या करामध्ये कच्च तेल वापरण्यायोग्य करने, देशभरात पोहचवने या गोष्टींचा समावेश असतो. यासाठी केंद्रा कडून हा खर्च ३२ रुपयांत केला जातो. राज्याच्या ३२ रुपयांमध्ये काही येत नाही. ३५ रुपये खरेदी किंमत वजा करता राज्य आणि केंद्राला ३२.५० प्रत्येकी मिळाले. त्यापैकी केंद्राच्या पैशातून २०-२२ रुपये खर्च झाले.
चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर ! म्हणाले- ‘ भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण ‘
यासाठी राज्य सरकारने इंधनाला जीएसटीमध्ये ऍड करण्यास विरोध केला होता. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. इंधनांच्या घरांमधील राज्याच्या वाट्या तिच्या 32.50 रुपयांमधून काहीच कमी झाले नाहीत तर राज्याने ते कमी करावेत. असा प्रयोग गुजरात राज्याने केला आहे. गोव्याने केला आहे. भाजपची नाही तर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगडने देखील केला आहे. तिथे पेट्रोल डिझेल 20 आणि 30 रुपयांनी स्वस्त आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सल्ल्यानुसार एकच वस्तू जीएसटीच्या बाहेर आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. ती वस्तू जीएसटीमध्ये घेतली की ताबडतोब 30 रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील पण अजित पवारांनी या गोष्टीला विरोध का केला? असा प्रश्न त्यांनी अजित पवार यांना यावेळी विचारला आहे.
Chandrakant Patil’s allegations against Ajit Pawar, said Pawar is responsible for the fuel price hike in the state
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना