विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chandrakant Patil उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे नाव न घेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सवाल केला आहे. तर महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? अशी विचारणा जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत केली आहे.Chandrakant Patil
गुरुवारी सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पटलांवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राजारामबापू पाटील यांचे नाव घेऊन झालेल्या टीकेचे निमित्त करून जयंत पाटील नावाची सभा सांगलीत झाली. यानिमित्ताने विजनवासात गेलेले जयंत पाटील पुन्हा प्रकाशझोतात आले, पण असे करून राजकारणाच्या प्रकाशझोतात येता येत नाही हे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसेल. पण, जयंत पाटील बचाव सभेत गोपीचंद पडळकर बाजूला राहिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या कुटूंबावर टीका झाली. फडणवीस यांना आका, टरबुज्या अशा शब्दांत टीका करण्यात आली जी आम्ही चालू देणार नाही.Chandrakant Patil
मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या?
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माझा घोटाळा काढू असे जयंत पाटील यांनी ट्विट केले, मी या आरोपांनी अस्वस्थ होत नाही. कारण असा घोटाळा झाला नाही हे 10 वेळा सिद्ध झाले, पण नाव न घेता एक अर्थमंत्री आणि त्याचा ऑनलाइन लॉटरी घोटाळा, एक ठाण्यातील आमदार आणि त्याची डायरी, एका पक्षाच्या नेत्याची नवी मुंबईतील मार्केट कमिटी हे नाव न घेता मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? तुम्ही धुतल्या तांदळागत आहात तर कशाला घाबरता? काचेच्या घरात बसून कुलूप लावून दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात, असा खोचक सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
तसेच राजारामबापू यांच्यावर पडळकर यांनी केलेल्या टीकेचे आम्ही समर्थन करणार नाही, पण हे कारण पुढे करून तुम्ही तुमच्या नेत्यावर टीका करणार असाल तर ती आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी बंद करूया, असे पुढे येऊन सांगावे. आम्ही 1 ऑक्टोबरचा इशारा मोर्चा मागे घेऊ, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना केले आहे.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केलेल्या टीकेला आज जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटील यांनी एक पोस्ट करत म्हटले, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हे पालकमंत्र्यांचे काम असते, पण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काल सांगलीत येऊन वाचाळवीरांना कसे वाचाळगिरी करायची हे ज्ञान देऊन गेले. सोबतच अनेक चौकशा करण्याची धमकी दिली, असे म्हणत जयंत पाटलांनी टीका केली आहे.
342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला?
पुढे जयंत पाटील म्हणाले, माझे चंद्रकांत पाटलांना आवाहन आहे की धमकी कोणाला देताय? कोणाला भीती घालताय? या क्रांतिकारी सांगली जिल्ह्याला? वाळवा तालुक्याला? असा सवाल केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? याच सांगलीत तुमचे एजंट फिरत आहेत, तोडपाणी करून तुमच्यासाठी काम करत आहेत. त्यांना मोकळीक कोणी दिली? असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.
Chandrakant Patil Taunts Jayant Patil: Caps Fit Your Head
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक