• Download App
    "Raut Will Split UBT Faction": MLA Chandrakant Patil’s Counterattack संजय राऊत शिवसेना ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; राऊत मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

    Raut : संजय राऊत शिवसेना ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; राऊत मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

    Raut

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Raut  शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.Raut

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळे झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत जळगावमध्ये लग्नाला येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.Raut



    तसेच एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार मी करू शकत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही असे कुठलेही काम करू तेव्हा थेट घरी बसू. संजय राऊत शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवा गट स्थापन करून उरलेली शिवसेना फोडण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटात राऊत हे मोठी उठाव करणार आहेत. ते नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावाही पाटलांनी केला आहे.

    काय म्हणाले होते संजय राऊत?

    संजय राऊत म्हणाले होते की, आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा पारोळाचे आमदार पुढची निवडणूक भाजपकडून लढतील. हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे मानले जातात. त्यामुळे ही माझी खात्रीची माहिती आहे, असा दावा राऊत यांनी केला होता.

    “Raut Will Split UBT Faction”: MLA Chandrakant Patil’s Counterattack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!

    तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या 12 % वर वाताहत झालेल्या राष्ट्रीय पक्षांना आपल्या नेत्यांनाही सांभाळता येईना!!; एका खासदाराचा राजीनामा, दुसऱ्याचे तिकीट कापले!!

    Bawankule : बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे:सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन