• Download App
    Maharashtra political controversy April 2026 | The Focus India

    Maharashtra political controversy April 2026

    Sushma Andhare : खरात प्रकरणात एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी; त्यांनाच प्रमुख करा, सुषमा अंधारेंचा टोला

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा ‘ब्रीच ऑफ प्रायव्हसी’चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा” असा टोला लगावला.

    Read more

    Anjali Damania : या, चहा प्या आणि CDR कसा काढला ते पाहा; अंजली दमानियांचे राऊत, अंधारेंना आमंत्रण

    भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. “सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या,” असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.

    Read more

    Raut : संजय राऊत शिवसेना ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; राऊत मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

    Read more