• Download App
    Chandrakant Patil Retorts to Ajit Pawar Over Pune Development Claims PHOTOS VIDEOS अजितदादा जनता खुळी नाही; तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पलटवार

    Chandrakant Patil : अजितदादा जनता खुळी नाही; तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पलटवार

    Chandrakant Patil

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Chandrakant Patil  राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच आता जुंपल्याचे पाहायला मिळत असून, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभय पक्षांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांनी भाजपचा उल्लेख ‘भ्रष्टाचारी’ असा केल्याने संतापलेल्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, ‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत, हे विसरू नका’ असा थेट इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, आता पुन्हा एकदा पाटील यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केल्याने महायुतीतील या दोन पक्षांमधील कलगीतुरा अधिकच रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे.Chandrakant Patil

    पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या कार्यकाळात पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय विकास झाला, असा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, पुणे मेट्रो आणि उड्डाणपूल हे आमच्या काळात झाले. नगरपालिका निवडणुकीत आपण विजय मिळवला, आता 15 तारखेला मतदान करून पुण्यात भाजपचा महापौर होणार आहे, असे पाटील म्हणाले.Chandrakant Patil



    अजित दादा जनता खुळी नाही

    चंद्रकांत पाटील म्हणाले, अजितदादा म्हणाले की, पिंपरी आणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. आता, महाविकास आघाडी विकास करायला पुढे आली आहे. जित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामांच्या यादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली, तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्यात तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाहीत. तुम्ही आम्हाला विचारता काय केले? मात्र आता जनता तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही काय केले?

    पुण्यात 80 हजार कोटींच्या विकासकामांचे आश्वासन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 80 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे आश्वासन दिले. कात्रज चौकात आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी, जनतेने मतदानाच्या दिवशी आमची काळजी घेतल्यास पुढील पाच वर्षे आम्ही जनतेची काळजी घेऊ, असे म्हटले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अनेक योजनांमुळे पुण्यात हा विकास आराखडा आणण्यात आला आहे. पुणे शहराची ओळख सांस्कृतिक, औद्योगिक आणि विद्येचे माहेरघर अशी असून, मागील पाच वर्षांत पुणे मनपात सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधकांनी आरसा पाहावा म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल, असेही ते म्हणाले.

    Chandrakant Patil Retorts to Ajit Pawar Over Pune Development Claims PHOTOS VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अकोट, अंबरनाथ मध्ये सत्तेचे समीकरण जुळले; भाजपचे AIMIM आणि काँग्रेस विरोधातले सोवळे सुद्धा नाही सुटले!!

    मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!

    रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती, मतदार यादी मध्ये नातेवाईक घुसविणे भोवले!!