• Download App
    Chandrakant Patil मताधिक्यात अजित पवारांपेक्षा चंद्रकांतदादा पाटील भारी

    Chandrakant Patil मताधिक्यात अजित पवारांपेक्षा चंद्रकांतदादा पाटील भारी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून लाखापेक्षा जास्त मताधिक्याने पंधरा आमदार निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढताना चंद्रकांत पाटील यांना झगडावे लागले होते. मात्र यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून यंदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे चंद्रकांतदादांनी मताधिक्यात अजित पवारांवर मात केली आहे.

    कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे होते. तब्बल 1 लाख 12 हजार 41 मतं घेत चंद्रकांत पाटील जिंकले. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांना 47,193 तर मनसेचे किशोर शिंदे यांना 18,105 मते मिळाली. शिंदे यांना गेल्या वेळी 80 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती

    निवडणूक प्रचारावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले चुलत बंधू शिवेंद्रराजे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला होता. पण त्यांचा शब्द थोडक्यात खाली पडला. शिवेंद्रराजे राज्यात पहिल्या क्रमांकाने नव्हे तर दुसऱ्या क्रमांकाने निवडून आले. पहिल्या क्रमांकाचा मान शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले काशिराम पावरा यांना मिळाला आहे. पावरा हे तब्बल 1 लाख 45 हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आले

    Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

    शिरपूर मतदारसंघ हा अमरीशभाई पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 पासून ही जागा राखीव आहे. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काशिराम पावरा हे तब्बल 1 लाख 45 हजार 944 मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात आली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर गेले असून अपक्ष उमेदवार डॉ जतेंद्र ठाकूर हे दुसऱ्या क्रमांकावर होते.

    खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला शब्द खरा करत शिवेंद्रराजे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले.

    सातारा विधानसभा मतदारसंघाची लढत यंदा चर्चेत होती. कारण ही लढत अत्यंत एकतर्फी होणार, असा अनेकांचा अंदाज होता. भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे तब्बल 1 लाख 42 हजार 124 च्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे यांना एकूण 1 लाख 76 हजार 849 मतं मिळाली आहेत.
    त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमित कदम मैदानात होते.

    राज्याचे कृषीमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा निवडणुकीवर यंदा सर्वांचं लक्ष होतं. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला जरांगे फॅक्टर कारण असल्याचं बोललं जात होतं. त्याच जरांगे फॅक्टरचा फटका धनंजय मुंडेंनाही बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुंडे तब्बल 1 लाख 40 हजार 224 च्या मताधिक्क्यानं निवडून आलेत. त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख मैदानात होते.

    बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे 1 लाख 29 हजार मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला.

    कोपरगावातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी 1 लाख 24 हजार मताधिक्क्यानं निवडून आलेत. या मतदारसंघात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यांनी माघार घेतल्याने काळे यांचा विजय सोपा झाला.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांचे गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे उभे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडीत 1 लाख 20 हजारांच्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. केदार दिघे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात होते.
    नागपूर पूर्वमधून भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी 1 लाख 15 हजार मताधिक्याने विजय मिळविला. त्यांना १ लाख ६३ हजार ३९० मते मिळाली. शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना ४८ हजार १०२ मते मिळाली.
    2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढताना चंद्रकांत पाटील यांना झगडावे लागले होते. मात्र यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून यंदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात ठाकरेंचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे त्यांच्याविरोधात होते. तब्बल 1 लाख 12 हजार 41 मतं घेत चंद्रकांत पाटील जिंकले. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांना 47,193 तर मनसेचे किशोर शिंदे यांना 18,105 मते मिळाली. शिंदे यांना गेल्या वेळी 80 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती

    ओवळा माजीवाड्यात शिवसेना शिंदें गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तब्बल 1 लाख 9 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात लढत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांना 76020 मते मिळाली

    मावळ विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणूक यंदा गाजली ती भेगडे आणि शेळके यांच्या वादामुळे. माजी मंत्री आणि भाजप नेते बाळा भेगडे यांच्या गटाचा शेळकेंना विरोध होता. मात्र तरीही सुनील शेळके हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना तब्बल 1 लाख 8 हजार 565 मतं मिळाली आहेत.

    मेळघाटचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांनी 1 लाख 6 हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला.

    मालेगाव बाह्यमधून माजी मंत्री दादाजी भुसे 1 लाख 6 हजार मताधिक्क्यानं निवडून आले आहेत.

    चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप 1 लाख 3 हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांना 2 लाख 35 हजार 323 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल कराटे यांना 1 लाख 03 हजार 865 मते मिळाली.

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी यंदा अटीतटीचा सामना ठरेल अशी शक्यता होती. कारण विरोधात स्वतः शरद पवार यांचे उमेदवार युगेंद्र पवार होते. हा लढा अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवार विरुद्ध शरद पवार असा होता. त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या लढ्यावर होतं. मात्र, अजित पवार तब्बल 1 लाख 899 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 1 लाख 81 हजार 132 मते मिळाली. युगेंद्र पवार यांना 80 हजार 233 मते मिळाली.
    बोरिवलीतून भाजपचे संजय उपाध्याय यांनी 1 लाख 257 मतांनी विजय मिळवला. त्यांनी 1 लाख 39 हजार 947 मते घेतली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे संजय भोसले यांना 39 हजार 690 मतेच मिळू शकली.

    Chandrakant Patil Outshines Ajit Pawar in Vote Margin

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस