• Download App
    चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिले आदेश , म्हणाले - नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल कराChandrakant Patil gave orders to the workers, said - file a complaint against Nana Patel

    चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिले आदेश , म्हणाले – नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल करा

    पाटील म्हणाले की , नाना पटोले हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे.Chandrakant Patil gave orders to the workers, said – file a complaint against Nana Patel


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करणार होते, परंतु सुरक्षा व्यवस्थेतील मोठ्या त्रुटीमुळे ती रद्द करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला.



     

    यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की , नाना पटोले हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, अशीही आपली मागणी असल्याचं पाटील म्हणाले.

    तसंच पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचना आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

    Chandrakant Patil gave orders to the workers, said – file a complaint against Nana Patel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !