लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून मदत म्हणून आलेली चणाडाळ गोरगरीबांच्या तोंडात जाऊ न देता सडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. छगन भुजबळ यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा प्रताप केला आहे. Chanadal rotted out of the mouths of the poor, Chhagan Bhujbal’s Food and Civil Supplies Department responsible
विशेष प्रतिनिधी
मुंबई: लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून मदत म्हणून आलेली चणाडाळ गोरगरीबांच्या तोंडात जाऊ न देता सडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. छगन भुजबळ यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा प्रताप केला आहे.
केंद्र सरकारने राज्याला पाठवलेली सुमारे एक हजार टन चणाडाळ सरकारच्या गोदामात, दुकानात पडून सडली या डाळीचे सर्वसामान्य जनतेला फेरवाटपाचे निर्देश वेळेत दिले गेले असते तर आज कित्येक परिवाराला त्याचा लाभ मिळाला असता. या डाळ नासाडीबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत तातडीने चौकशी करावी आणि संबंधित मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केली होती.
लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेअंतर्गंत पाठवलेली चणाडाळ राज्यातील गोदामात तशीच पडून राहिली. आमदार कोटेचा यांनी हा प्रकार उघड केल्यावर भुजबळ यांना उपरती झाली शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजना – १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एप्रिल, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थींना प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य व प्रतिशिधापत्रिका १ किलो तूरडाळ, चणाडाळ मोफत वाटप करण्यात आली होती. त्यासाठी केंद्रशासनाने राज्यासाठी १, १३, ४२ मेट्रिक टन डाळींचे नियतन दिले होते.
एकंदरीत तुरडाळ व चणाडाळ यांचे वितरण शक्यतो लवकरात लवकर होणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील शिल्लक ६, ४४२ मे.टन डाळीचे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे त्यातील बहुतांश डाळ खाण्यास योग्य राहिलेली नाही.
Chanadal rotted out of the mouths of the poor, Chhagan Bhujbal’s Food and Civil Supplies Department responsible
इतर बातम्या
- ISRO शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात खटला भरणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; सुप्रिम कोर्टाचे आदेश
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीड हजार स्वयंसेवकांचे कुंभमेळ्यामध्ये योगदान , विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्य ; गर्दी, वाहतूक नियंत्रणासाठी भरीव मदत
- NIA कडून लष्कर ए तैयबाचे पश्चिम बंगाल – काश्मीर यांचे जिहादी भरती कनेक्शन expose; रिक्रुटिंग एजंटला काश्मीरमधून अटक
- पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीमध्ये बदल; आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कव्हर फायरिंग; भारताचेही नव्या स्ट्रॅटेजीने प्रत्युत्तर
- विमानप्रवाशांना कोरोनाची मोठी धास्ती, प्रवाशांची संख्या आली अवघ्या दोन लाखांवर