• Download App
    Chakkajam of Swabhimani all over Maharashtra on March 4; Demand for daily power supply to farmers

    स्वाभिमानीचे ४ मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठ्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चार मार्चपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. Chakkajam of Swabhimani all over Maharashtra on March 4; Demand for daily power supply to farmers

    महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही.

    शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या चार फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभागी होऊ देणार नाही असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

    Chakkajam of Swabhimani all over Maharashtra on March 4; Demand for daily power supply to farmers

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!