दुचाकीवरून येवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून धूम स्टाइल पळून जाणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांंस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –दुचाकीवरून येवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून धूम स्टाइल पळून जाणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांंस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. यामुळे जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. Chain snatching accused arrested by Pune rural LCB team
याप्रकरणी मंगल बजरंग नानावत (वय २३, रा वढू बुद्रुक ता शिरूर जि पुणे) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ एप्रिल रोजी सासवड (ता. पुरंदर) पोलिस ठाण्याचे हद्दीतील चांदणी चौक येथे मंगल राजेंद्र हाडके (वय ५०, रा. सासवड,पुणे) यांचे गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकी वरून
आलेल्या २ अज्ञात इसमानी हिसका मारून धुम स्टाईल जबरी चोरी करून नेले होते.सदर बाबत सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रोहित किशोर मन्नावत (वय१८, रा. वढू बुद्रुक,पुणे) याला यापुर्वी अटक करण्यात आली आहे. परंतू नानावत तेव्हापासून फरार होता.
त्याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदरमार्फत मंगल नानावत हा २५ एप्रिल रोजी हा रांजणगाव येथे येणार असल्याचे समजले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, धिरज जाधव, पूनम गुंड, पौड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रॉकी देवकाते व साहिल शेख यांनी सदर ठिकाणी सापळा रचून पानात याला ताब्यात घेतले.
अधिक चौकशीत त्यांने सासवड, लोणी काळभोर, देहू रोड, भोसरी औद्योगिक वसाहत या चार पोलीस ठाण्याचे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर तो शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील दोन तर लोणीकंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गुन्ह्यात फरार आहे. पुढील तपासासाठी त्याला सासवड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे .
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपधिक्षक भोर धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनखाली करण्यात आली आहे.