• Download App
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; केंद्र तसेच कर्नाटक सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी; खासदार संभाजीराजेंची मागणी । Central, Karnataka government should take stringent action against the culprits; Demands Yuvraj MP Sambhaji Raje

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; केंद्र तसेच कर्नाटक सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी; खासदार संभाजीराजेंची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा कडक निषेध नोंदवत याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरमधून केली आहे. Central, Karnataka government should take stringent action against the culprits; Demands Yuvraj MP Sambhaji Raje

    कर्नाटकच्या बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बेंगलोरतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.



    बंगळुरू येथील घटनेचा युवराज खासदार संभाजीराजे यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगलोर येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र तसेच कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    Central, Karnataka government should take stringent action against the culprits; Demands Yuvraj MP Sambhaji Raje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!