CBSE 12th optional examination : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून असे नमूद केले आहे की, 12 वीची वैकल्पिक परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान घेता येईल. या परीक्षा पर्यायी असतील आणि विद्यार्थ्यांना हवे असल्यास ते देऊ शकतात. तसेच 31 जुलैपर्यंत बोर्ड नुकत्याच केलेल्या निकषांच्या आधारे 12 वीचा निकाल जाहीर करेल. जे विद्यार्थी समाधानी नाहीत, ते परीक्षेत देऊ शकतात. या परीक्षेत मिळविलेले गुण अंतिम गुण असतील. CBSE 12th optional examination may start after August 15, affidavit given in Supreme Court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून असे नमूद केले आहे की, 12 वीची वैकल्पिक परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान घेता येईल. या परीक्षा पर्यायी असतील आणि विद्यार्थ्यांना हवे असल्यास ते देऊ शकतात. तसेच 31 जुलैपर्यंत बोर्ड नुकत्याच केलेल्या निकषांच्या आधारे 12 वीचा निकाल जाहीर करेल. जे विद्यार्थी समाधानी नाहीत, ते परीक्षेत देऊ शकतात. या परीक्षेत मिळविलेले गुण अंतिम गुण असतील.
परीक्षा देणाऱ्यांचा निकाल असा ठरेल
बोर्डाच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांचा निकाल 30:30:40 निकषांच्या आधारे तयार केला जात आहे. परंतु जे परीक्षा देतील, त्यांचा अंतिम निकाल लेखी परीक्षा गुणांच्या आधारे दिला जाईल. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. लवकरच यासंदर्भात बोर्ड अधिक माहिती देणार आहे. याशिवाय, निकालावरील विद्यार्थ्यांच्या आक्षेपांवर एक समिती लक्ष देईल, असे मंडळाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत
नुकतीच सीबीएसईने 12वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचे सूत्र सांगितले होते. त्यानुसार दहावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना 30 टक्के गुण, 11 वीच्या निकालाच्या आधारे 30 टक्के गुण आणि 12 वी पूर्व-बोर्ड / अंतर्गत मूल्यांकनानुसार 40 टक्के गुण देण्यात येतील. हे सूत्र वापरून बोर्ड 12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करेल.
निकाल तयार करण्यासाठी आयटी सिस्टिम
दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी आयटी यंत्रणा विकसित केली जात असल्याची माहिती सीबीएसईने काही दिवसांपूर्वी बोर्डाशी संबंधित सर्व शाळांना पत्र लिहून दिली होती. याशिवाय हेल्प डेस्कदेखील तयार केले जाईल, याद्वारे शाळांना निकाल मिळण्यास मदत होईल. याचा वापर करून निकाल कमी वेळेत तयार करता येणार आहे.
CBSE 12th optional examination may start after August 15, affidavit given in Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- आता तामिळनाडुची अर्थव्यवस्था सुधारणार रघुराम राजन, सरकारने दिली ही मोठी जबाबदारी
- कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना अच्छे दिन!, ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये 3 महिन्यांत 1000% उसळी
- धर्मांतराचे रॅकेट : पाकमधून फंडिंग, पैशांचं आमिष, मुलं-महिलांवर नजर… धर्मांतरण रॅकेटप्रकरणी पोलिसांचे 10 खुलासे
- धर्मांतरणाचे रॅकेट : आधी हिंदूच होता धर्मांतरणाप्रकरणी अटकेतील मौलाना उमर गौतम, सांगायचा मुस्लिम बनण्याची ‘ही’ कहाणी
- यूपीए Vs राष्ट्रमंच : ‘शरद पवारांचा हा पहिलाच प्रयत्न नाही’, राष्ट्रमंचच्या 15 विरोधी पक्षांच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया