• Download App
    भ्रष्टाचारप्रकरणी CBI अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स । CBI In Action Mode, Anil Deshmukh's two personal assistants summoned

    भ्रष्टाचारप्रकरणी CBI अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स

    CBI : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा सीबीआयने तपास सुरू केलाय. सीबीआय पथकाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स बजावले आहे. नुकताच सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. CBI In Action Mode, Anil Deshmukh’s two personal assistants summoned


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा सीबीआयने तपास सुरू केलाय. सीबीआय पथकाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स बजावले आहे. नुकताच सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध प्राथमिक चौकशी (पीई) खटला दाखल केला आणि पथकाने मंगळवारी मुंबई गाठली. सर्व संबंधित कागदपत्रे गोळा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. प्राथमिक तपासणी सुरू झाली असून सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने 5 एप्रिल 2021च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने प्राथमिक चौकशी नोंदविली आहे.

    तत्पूर्वी, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण तेथून त्यांनाच धक्का बसला. महाराष्ट्र सरकार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत म्हटले की, हे प्रकरण गंभीर असल्याने निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र सरकारचे अनेक उच्च अधिकारी या प्रकरणात सामील आहेत, त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे.

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौल यांनी म्हटले की, अनिल देशमुखांवर एखाद्या शत्रूने आरोप केलेले नाहीत. कोर्टाने म्हटले की, तुमचा ‘राइट हँड’ असलेल्या एका व्यक्तीने तुमच्यावर आरोप केले आहेत. अनिल देशमुखांवर निलंबित एपीआय सचिन वाझेकरवी मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राजीनामा दिल्यानंतरही देशमुखांचे हे प्रकरण शांत झालेले नाही. आता सीबीआय तपासातून काय सत्य समोर येते याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

    CBI In Action Mode, Anil Deshmukh’s two personal assistants summoned

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस