विशेष प्रतिनिधी
पुणे : काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून एका जुनिअर आर्टिस्ट अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आज पर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केले असून कोणाला काही सांगितल्यास तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली. Casting couch in Pune, rape of junior actress by inviting her to a party, crime against casting director
अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40, रा. मधुबन सोसायटी, कळस) असे गुन्हा दाखल झालेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. तो सन फिल्मस नावाच्या फिल्म कंपनीत काम करतो. याप्रकरणी 21 वर्षीय ज्युनियर अभिनेत्रीने फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी याबाबत सांगितले की पीडित अभिनेत्री ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. आरोपी अमित सिटलानीहा सन फिल्म नावाच्या एका फिल्म कंपनीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. या दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये सोबत काम केलेले आहे. मे 2017 ते 26 मार्च 2022 या कालावधीमध्ये आरोपीने या अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
- प्रगत महाराष्ट्रावर कलंक, अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचारांत उत्तर प्रदेशा पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर
ही अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून तेथे 21 वर्षांची होईपर्यंत तिचे लैंगिक शोषण करीत होता. 26 मार्च रोजी आरोपीने या तरुणीला टिंगरे नगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी घेऊन गेला. त्या ठिकाणी तिची बदनामी करण्याची धमकी देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 2018 पासून 2022 पर्यंत तिच्यासोबत वेळोवेळी केलेल्या शरीरसंबंधाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. तिला ईस्ट फिल्ड हॉटेल, विमाननगर आणि स्काय विस्टा हॉटेल, खराडी या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला
मारहाण देखील केल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. ही पीडित अभिनेत्री एकटी राहते. तिच्या आई-वडिलांनामध्ये कौटुंबिक वाद असल्यामुळे ते विभक्त राहतात. त्यामुळे कोणाचाच आधार नसल्याने या अभिनेत्रीने घाबरून कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती. परंतु, अमित सिटलानी याचे अत्याचार सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला.