शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एमएमआरडीएचा निर्णय
प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसाठी बांद्रा – कुर्ला संकुलातील जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणाने घेतला आहे. या जागेची किंमत 10 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामालाही गती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.Bullet train now running in Maharashtra;10000 crore land in BKC will be given!!
बीकेसीतील मोक्याची जागा
बीएकेसीतील मोक्याची 5.65 हेक्टर जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाला वेग आल्याचे दिसत आहे. ठाकरे सरकारने केंद्र सरकारच्या या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.
10000 कोटी किंमतीची जमीन
बीकेसीतील ही जागा अत्यंत मोक्याची असल्याने या जागेची किंमत तब्बल 10 हजार कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याठिकाणी बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
Bullet train now running in Maharashtra;10000 crore land in BKC will be given!!
महत्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवात बड्यांच्या भेटी; बांधणार का नव्या राजकीय गाठी??
- अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात बाप्पाच्या दर्शनासोबतच राजकीय व्यूहरचनेच्या बैठका!!
- पश्चिम बंगाल, झारखंडमधील 28 ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे!!
- इस्रायलचा सीरियावर हवाई हल्ला : 2 विमानतळे लक्ष्य, शस्त्रे घेऊन जाणाऱ्या इराणच्या विमानावर 4 क्षेपणास्त्रे डागली