प्रतिनिधी
बुलढाणा : विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात टायर फुटून नव्हे, तर वेगळ्याच कारणाने झाल्याचे समोर येत आहे. कारण बसचालक दानिश इस्माईल शेख याचे निवेदन आणि पोलिसांची माहिती भिन्न आहेत.
नागपूरहून ती पुण्याच्या दिशेने येत असताना समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी बस चालक दानिश इस्माईल शेखला अटक केली असून चौकशी सुरू आहे. Buldhana Bus Accident: There is no bus accident due to tire burst
पोलीस आरटीओने या अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात आणि बस चालकाने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. बस चालक दानिश शेखच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओने दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे.
टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघातातबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी गृह विभागाने अपघाताची चौकशी सुरु केली आहे. बस चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत सर्वात भीषण असा अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स ची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली.
या अपघातानंतर बसने पेट घेतला, त्यानंतर लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. अक्षरशः या प्रवाशांचा जळून कोरपा झाला आहे.. त्यामुळे समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण असा अपघात असल्याचं सांगितलं जातंय.
Buldhana Bus Accident: There is no bus accident due to tire burst
महत्वाच्या बातम्या
- भीषण अपघात! समृ्द्धी महामार्गावर बस जळून खाक, २५ प्रवाशांचा मृत्यू
- पवारांना अपेक्षित अजेंडा मराठी माध्यमांनीच केला “फेल”!! वाचा, कोणता आणि कसा??
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव
- मी “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या, अन्यथा माफी मागा; आचार्य तुषार भोसलेंचे शरद पवारांना खणखणीत प्रत्युत्तर