Wednesday, 7 May 2025
  • Download App
    राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा होण्याचा मान आता बुलढाणा जिल्ह्याला ; सध्या ४३ रुग्ण|Buddhana Will be first district in Maharashtra with Zero covid cases soon , Only 43 active cases remains

    राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा होण्याचा मान आता बुलढाणा जिल्ह्याला ; सध्या ४३ रुग्ण

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे एक जिल्हा संपूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. या जिल्ह्यात अवघे ४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे हा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. Buddhana Will be first district in Maharashtra with Zero covid cases soon , Only 43 active cases remains

    महाराष्ट्रात शनिवारी एकूण 1,55,474 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वात कमी सक्रिय रुग्ण हे बुलढाणा जिल्ह्यात आहेत. आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे हा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार आहे.

    जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 82032 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी 81350 रुग्णांनी मात केली आहे. तर 634 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत.

    परभणीत एकही रुग्ण नाही

    राज्यात आज एकूण 10697 नवीन रुग्णांची नोंद झाली. मात्र, परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज एकही रुग्णाची नोंद झालेली नाही.

    Buddhana Will be first district in Maharashtra with Zero covid cases soon , Only 43 active cases remains

    Related posts

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!