• Download App
    "रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा" प्रताप सरनाईकांचा उपक्रम । "Bring an empty cylinder and fill it with free oxygen" is the initiative of Pratap Sarnaik

    “रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा” प्रताप सरनाईकांचा उपक्रम 

    पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. “Bring an empty cylinder and fill it with free oxygen” is the initiative of Pratap Sarnaik


    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे .  पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली.

    हा ‘ऑक्सिजन प्लांट’ पुढील 3 ते 4 दिवसात लोकार्पण झाल्यानंतर दररोज 120 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती त्यातून होणार आहे. मीरा भाईंदरमधील नागरिकांना हे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत, असे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा भव्य प्लांट उभारला गेला आहे. मीरा भाईंदर येथे मीरा रोड , मंगल नगर , हटकेश येथे प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.



    27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन प्लांटचे प्रात्यक्षिक झाले. हा ऑक्सिजन प्लांट कसा चालेल , कसे हवेतून ऑक्सिजन निर्माण करून ते सिलेंडरमध्ये भरले जाईल याचे प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले.
    आमदार सरनाईक यांनी हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागील संकल्पना प्लांटची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

    आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे. या प्लांटचे काम पूर्ण झाले असून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते लवकरच ऑनलाईन पद्धतीने या ऑक्सिजन प्लांटचे म्हणजेच प्राणवायू प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे.

    यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर दिवस रात्र हा प्लांट मीरा भाईंदरमधील जनतेला सेवा देईल , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त , वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते.

    “Bring an empty cylinder and fill it with free oxygen” is the initiative of Pratap Sarnaik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस