- मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
- आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते.
- आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- जस्टीस एस.एस.जाधव आणि पी.के.चव्हाण यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : २०१३ साली संपूर्ण मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. तिन्ही आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचं हायकोर्टाने आजन्म कारावासात रुपांतर केलं आहे. तिन्ही आरोपींना आपलं उर्वरित आयुष्य आता जेलमध्ये काढावं लागणार असून त्यांना पॅरोल आणि फर्लो अशा सवलतींचाही लाभ मिळणार नाही. Breaking News: Mumbai-2013- Gang rape case against female photographer at Shaktimil! High court quashes death sentence of accused Life imprisonment for all three
बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तेथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका १९ वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता.
मुंबई क्राईम ब्रांचने यादरम्यान तपासाची सूत्र वेगाने हलवत विजय जाधव, मोहम्मद कासिम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, सिराज रेहमान खान आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. मार्च २०१४ मध्ये सेशन्स कोर्टाने जाधव, बंगाली आणि अन्सारी यांना दोषी मानलं होतं. यापैकी सिराज रेहमान खानला आजन्म कारावास तर अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये पाठवण्यात आलं होतं.
सेशन्स कोर्टाच्या तत्कालीन जज शालिनी फणसळकर-जोशी यांनी या प्रकरणात IPC चं सेक्शन 376 E लावत उर्वरित तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. ज्या शिक्षेचं हायकोर्टाने आजन्म कारावासात रुपांतर केलंय.
Breaking News : Mumbai-2013- Gang rape case against female photographer at Shaktimil! High court quashes death sentence of accused Life imprisonment for all three
महत्त्वाच्या बातम्या