विशेष प्रतिनिधी
नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर शिंगोटे येथे झाले आहे. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकर परिसरात तळ्यामध्ये सुशोभीकरण करून गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. Brand munde come out of marathwada; Gopinath munde statue inaugurated at nandur shingote in nashik district
त्याचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे पालकमंत्री दादाजी भुसे आदी नेत्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी सर्वांची गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली. पण माध्यमांनी मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची चर्चा घडविली.
देवेंद्र फडणवीस हे पूर्वनियोजित कार्यक्रमात नागपूरला आहेत. नागपूर मध्ये जी 20 परिषदेची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दौरा आहे. मात्र मराठी माध्यमांनी गोपीनाथ मुंडे पुतळा अनावरणाच्या प्रसंगानिमित्ताने देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय मतभेदाच्या बातम्या विशेष रंगवून दिल्या आहेत.
मतभेदांच्या बातम्या रंगविण्यात रस
माध्यमांनी या आधीही अनेक वेळा पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यातल्या मतभेदाच्या बातम्या रंगवून दिल्या आहेतच, पण त्या पूर्वी देखील मराठी माध्यमांनी नितीन गडकरी – गोपीनाथ मुंडे यांच्याही मतभेदाच्या बातम्या रंगविल्या होत्या. महाराष्ट्रात मुंडे गट आणि गडकरी गट ही परिभाषा भाजपमध्ये असण्यापेक्षा माध्यमांमध्ये जास्त होती. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर देखील माध्यमांची ही भाषा बदलली नव्हती.
मुंडे ब्रँडची व्यापकता
आज नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक तयार झाल्यानंतर मुंडे हा राजकीय ब्रँड जेव्हा मोठा होऊन मराठवाड्याबाहेर पडतो आहे, त्यावेळी देखील मुंडे ब्रँडची व्यापकता न मांडता मराठी माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना न दिलेले निमंत्रण असलेले आणि नसलेले निमंत्रण आणि त्यांचे आणि पंकजा मुंडे यांचे असलेले नसलेले मतभेद याच्या बातम्यांवर भर दिला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला शेतकरी मेळावा त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी आणि अन्य नेत्यांची झालेली भाषणे याकडे मात्र माध्यमांनी दुर्लक्ष केले आहे.
मराठवाड्याबाहेरील स्मारकाला महत्त्व
गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना – भाजप युतीचे एक महत्त्वाचे शिल्पकार होते. त्यांचा महाराष्ट्रव्यापी प्रभाव असताना मराठी माध्यमांनी त्यांचे चित्र मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नेते एवढे मर्यादित अर्थाने रंगवले होते. परंतु, मराठवाड्याबाहेर उत्तर महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यात नांदूर शिंगोटे येथे त्यांचे भव्य स्मारक होणे याला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व आहे. यावर मराठी माध्यमांनी भर न देता केवळ मुंडे – फडणवीस यांच्यातल्या कथित मतभेदाच्या बातम्या रंगवून आपले वेगळे इरादे स्पष्ट केले आहेत. पण म्हणून मुंडे ब्रँड मराठवाड्याबाहेर पडून तो महाराष्ट्रव्यापी होतोय, हे वास्तव त्यामुळे लपत नाही.
Brand munde come out of marathwada; Gopinath munde statue inaugurated at nandur shingote in nashik district
महत्वाच्या बातम्या
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!
- फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??
- विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!
- नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय