• Download App
    मलंगगडावर मुला मुलींना कपड्यावरून मारहाण; समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ। Boys and girls at Malanggad Beating on clothes

    मलंगगडावर मुला मुलींना कपड्यावरून मारहाण; समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कल्याण येथील मलंगगडावर फिरायला गेलेल्या दोन मुले आणि दोन मुलींना रविवारी बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यावरून ही मारहाण झाली. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. Boys and girls at Malanggad Beating on clothes

    मालंगगडावर फिरायला गेलेल्या मुला मुलींना तुम्ही तोकडे कपडे घातले असल्याचे सांगून 6 ते 8 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पण, कुणी कोणते कपडे घालायचे हे ठरविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. तसेच नेवाळी ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली नाही. तसेच त्यांच्यावर उपचारही पोलिसांनी केले नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी या गंभीर प्रकारची नोंद घ्यावी. पोलीस जनतेचे रक्षण करू शकत नसतील तर जनतेने स्व संरक्षणासाठी आता हत्यार बाळगण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अशा प्रकारची घटना औरंगाबाद येथेही घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याचे वृत्त आहे.

    • मलंगगडावर फिरायला गेलेल्या मुला मुलींना मारहाण
    • समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ
    • अयोग्य कपडे घातले असल्याचे सांगून मारहाण
    • नेवाळे पोलीस ठाण्यात तक्रारीची दाखल नाही
    • जखमींवर उपचार करण्याची तसदी घेतली नाही
    • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
    • समाजकंटक मोकाट, जनता बेहाल
    • स्वसंरक्षणासाठी हत्यारे बाळगण्याची आता गरज

    Boys and girls at Malanggad Beating on clothes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर