29 जून 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास घडून गेला. महाराष्ट्रातल्या दोन बलाढ्य राजकीय घराण्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा आज शेवटचा दिवस ठरला. तो म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन राजकीय ध्रुवांनी ठाकरे घराणे आणि पवार घराणे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा हा शेवटचा दिवस ठरला!!Both Thackeray and Pawar could not complete their term as chief minister
पण त्याही पलिकडे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे एक वेगळे राजकीय रहस्य आहे, ते म्हणजे ज्या शरद पवारांच्या भरवशावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची 25 वर्षे पूर्ण करणार होते, त्यांना 2.5 वर्षात पायउतार व्हावे लागले आहे.
उद्धव ठाकरे आपली मुख्यमंत्री पदाची मुदत पूर्ण करू शकले नाहीत, हे खरेच!! पण हे फक्त ठाकरे घराण्याचे वैशिष्ट्य ठरले नसून याआधी स्वतः शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री बनले असले तरी त्यांना एकदाही मुख्यमंत्रीपदाची मुदत पूर्ण करता आली नव्हती. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्यापासून फारकत घेऊन शरद पवार वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले पण त्यावेळी “वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते”, अशी त्यांची प्रतिमा बनली. त्यांचे 78 सालचे मुख्यमंत्री पद अवघे दोन वर्ष टिकले. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीवर नंतर पुन्हा सत्तेवर येताच पवारांचे सरकार बडतर्फ केले होते.
शरद पवार 1986 मध्ये काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा मुख्यमंत्री बनले. पण त्यावेळी देखील ते मुख्यमंत्री मपदाची मुदत पूर्ण करू शकले नाहीत. 1990 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले पण 91 साली पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून थेट संरक्षण मंत्री पदावर नेमले. 1993 मध्ये नरसिंह रावांनी पवारांच्या इच्छेविरुद्ध महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर परत पाठवले. परंतु त्यानंतर अवघ्या दोन वर्षात त्यांच्याच नेतृत्वाखाली अखंड असणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीने दारुण पराभव केला होता. 1995 मध्ये शरद पवारांना विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर शरद पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आलेले नाहीत.
ठाकरे घराण्याने कधीच मुख्यमंत्री पदाची अपेक्षा धरली नव्हती. परंतु 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी “शिवसेनेला मुख्यमंत्रीपद” या मुद्द्यावरून भाजपची फारकत घेतली आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पायंडा मोडायला लावून मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांना गळ्यात घालायला लावली होती. परंतु, ठाकरे घराण्याचे हे वारस पवारांच्या भरवशावर मुख्यमंत्री बनले तरी आपली मुदत मात्र पूर्ण करू शकले नाहीत!!
स्वतः शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जरी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेतला नसला तरी खुद्द उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच त्यांच्या विरोधात गेली. शिवसेनेचे तब्बल 39 आमदार नाराज होऊन बाहेर पडले त्यासाठी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवारच कारणीभूत ठरले. शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात डावलण्यात आले. गेल्या अडीच वर्षात भरपूर निधी देऊन राष्ट्रवादीचे भरण पोषण करण्यात आले. यामुळे शिवसेनेचे 39 आमदार चिडले आणि यातूनच उद्धव ठाकरे यांना अवघ्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.
महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकीय घराण्यांना पवार आणि ठाकरे यांना अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपदाची आपली मुदत पूर्ण करता आलेली नाही.
Both Thackeray and Pawar could not complete their term as chief minister
महत्वाच्या बातम्या
- सत्तांतराचे इंगित : राष्ट्रवादीच्या निधी खेचण्यातच शिवसेना आमदारांची होरपळ आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचीही परवड!!
- ठाकरे – पवार सरकार कोसळले : शेवटच्या भाषणातही बंडखोरांवरच कटाक्ष!!; उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे!!
- मुख्यमंत्रीपद राजीनामा : वाजपेयी, देवेगौडांच्या मांदियाळीत जाऊन बसले उद्धव ठाकरे!!
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून नवी “म्हण” तयार; पवारांच्या भरवशावर टिकले अडीच वर्षे ठाकरे सरकार!!