विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले. त्यानंतर उत्साहात आलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागांवर निवडून येईल, याचा मोठा आकडा सांगून टाकला.Both jayant patil contradicts sharad pawar’s number in maharashtra assembly elections
एरवी शरद पवार कधी थेट आकडे सांगत नाहीत. चांगले यश मिळेल एवढ्या पुरतेच भाष्य करतात, पण मोदींविरोधातल्या विजयामुळे उत्साहात आलेल्या पवारांनी महाराष्ट्र विधानसभेचा एकदम 225 चा आकडा सांगितला. विधानसभेत महाविकास आघाडी 288 पैकी 225 जागांवर निवडून येईल, असा दावा पवारांनी केला.
मात्र पवारांच्याच आघाडीतले दोन जयंत पाटील या आकड्याने हबकल्याचे दिसले. महाराष्ट्र विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना निवडून आणणे शरद पवारांना शक्य झाले नाही. जयंत पाटलांना फक्त 12 आमदारांनी मते दिली. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या जयंत पाटलांनी विधानसभेचा आकडा एकदम खाली आणला. महाविकास आघाडी बरोबर आपण राहू. महाविकास आघाडी 180 जागा जिंकेल, असा दावा जयंत पाटलांनी केला. पण पवारांनी 225 चा आकडा सांगितला होता हे मात्र जयंत पाटील विसरले. कदाचित विधान परिषदेचा धक्का बसल्याने जयंत पाटलांनी पवारांचा आकडा खाली आणला असावा.
खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर तो आकडा आणखी खाली आणला. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध मोठा असंतोष असल्याचा दावा करून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत 170 जागा जिंकेल, असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी केला. हा दावा करताना आपणच आपल्याच नेत्याने सांगितलेल्या 225 चा आकड्यातून तब्बल 55 आकड्याची वजाबाकी करत आहोत याचे भानही जयंत पाटलांना राहिले नाही.
ते काही असले तरी महाविकास आघाडीतली आकड्यांची विसंगती तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या आकड्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली. यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांमधला घटलेला आत्मविश्वास देखील दिसला.
Both jayant patil contradicts sharad pawar’s number in maharashtra assembly elections
महत्वाच्या बातम्या
- पूजा खेडकरच्या वडिलांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल; जमीन वादप्रकरणी पोलिसांचा शोध; पत्नी मनोरमा यांना काल लॉजमधून अटक
- मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!
- जम्मू-काश्मिरात 3 जागी एन्काउंटर, कुपवाड्यात 2 अतिरेकी ठार; दहशतवाद्यांचा अस्थायी कॅम्पवर हल्ला, 2 जवान जखमी
- ‘पाच दिवसांत बॉम्बने उडवून देईन’ एलएलबीच्या विद्यार्थ्याने प्रसिद्धीसाठी सीएम योगींना दिली धमकी