विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराचा धुरळा आज खाली बसला असताना काँग्रेस आणि भाजप या गावात घमासानात वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी जी सर्वेक्षणे केलीत, त्यातून काँग्रेसला सत्तेचा “बूस्टर डोस” मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्या मतांमधली तफावत तब्बल 5 % ची आहे. म्हणजे भाजप 35 % आणि काँग्रेस 40% यांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रत्यक्ष विधानसभेतील बलाबलामध्ये देखील काँग्रेस शंभरी पार करून बहुमताच्या दिशेने, तर भाजप 80 ते 100 च्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणात दिसत आहे. इतकेच नाही, तर मुख्यमंत्री पदाच्या चॉईस मध्ये काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या 42 % मते मिळवून टॉप वर आहेत, तर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बमय यांना 35 % मते मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. “Booster dose” of power to Congress in Karnataka
या सर्वांचा अर्थ कर्नाटकात काँग्रेसला सत्तेचा “बूस्टर डोस” मिळू शकतो असा आहे. पण महाराष्ट्रात हाच “बूस्टर डोस” महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यासाठी मात्र “अँटी बूस्टर डोस” ठरण्याची शक्यता आहे!!
राष्ट्रवादी – ठाकरे गटाला खोडा
कर्नाटकातल्या विजयामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात आणि देशात जी शक्ती प्राप्त होणार आहे त्या शक्तीतून काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून लढली, तर वर्चस्व प्रस्थापित करून लढण्याचा प्रयत्न करेल आणि महाविकास आघाडीच्या बाहेर पडून लढली, तर स्वतंत्रपणे ताकद लावून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्या राजकीय भवितव्याला सुरुंग लावू शकेल. जागा वाटपात काँग्रेसची बार्गेरिंग पॉवर सर्व विरोधकांमध्ये निश्चित वाढेल आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षांना सुरुंग लागेल!!
सोनियांच्या चॉईस वर पवारांची कमेंट
तसेही शरद पवारांच्या आत्मचरित्रातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतच्या उल्लेखाने काँग्रेस नेते आधीच दुखावले आहेत. त्यातही अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात बाजूला करून पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्याचा निर्णय दस्तूर खुद्द सोनिया गांधी यांनी घेतला होता आणि पृथ्वीराज चव्हाण हे सोनियांच्या चॉईसचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावर पवारांनी केलेली कमेंट ही अर्थातच सोनियांच्या चॉईसवरची कमेंट मानण्यात आली आहे आणि इथेच काँग्रेस महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला धक्का देण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला गृहीत धरणे राष्ट्रवादीला अशक्य
काँग्रेस राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी पेक्षा जास्त चिवट पक्ष आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वदूर संघटना असलेला थोडक्यात साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे संघटना असलेला पक्ष आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविकास आघाडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस नेत्यांना ज्या पद्धतीने गृहीत धरून वागवत होते, तसे कर्नाटक मधल्या विजयानंतर वागवता येणार नाही आणि तसे वागवण्याचा प्रयत्न केला, तर महाविकास आघाडी तुटून काँग्रेस स्वतंत्रपणे लढून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धडा शिकवण्याचा इरादा बाळगून आहे. कर्नाटकच्या रिझल्ट मधून जर बूस्टर डोस मिळाला तर तोच नेमका राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी महाराष्ट्रात “अँटी बूस्टर डोस” ठरणार आहे.
“Booster dose” of power to Congress in Karnataka
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना