कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन लागलं की बहुतांश लोकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी घरात मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन म्हणजे टिव्ही. विविध टिव्ही शो बरोबर सिनेमा पाहून टाईमपास करणं हे अनेकांना आवडतं. पण लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सिनेक्षेत्रालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्यावर्षीपासून सुरू झालेलं हे संकट कमी होण्याचं नाव घेत नसल्यानं अनेक मोठ्या स्टार्सचे मोठे प्रोजेक्ट अडकून आहेत. कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा व्हावा हीच सध्या कलाकारांची इच्छा आहे. पण सध्यातरी त्याला काहीसा वेळ लागणार हे स्पष्ट आहे. या यादीतील काही प्रमुख चित्रपटांबाबत आपण जाणून घेऊ. Bollywood facing economic crisis due to corona
हेही वाचा
- WATCH : कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम
- WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO
- WATCH : रोहित शर्मा IPL मध्ये अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती
- WATCH | SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या
- WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या