• Download App
    BOLLYWOOD: Akshay Kumar's mother's condition critical - admitted to ICU; Actor leaves shooting in Mumbai

    BOLLYWOOD :अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर -आयसीयूमध्ये दाखल ; अभिनेता शुटिंग सोडून मुंबईत

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून मुंबईला परतला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून मुंबईला परतला आहे. अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. BOLLYWOOD: Akshay Kumar’s mother’s condition critical – admitted to ICU; Actor leaves shooting in Mumbai

    अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. तब्येत बरी नसल्याने त्याने आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी तो लगेच भारतात परतला आहे.



    कामावर परिणाम होऊ दिला नाही!

    अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमीटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.

    ‘बेल बॉटम’ चाहत्यांच्या पसंतीस

    नुकतीच चित्रपटगृहे उघडल्यानंतर अक्षय कुमारने आपला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षयचा अभिनय आणि लूक चित्रपटात चांगलाच गाजला आहे.

    अक्षयच्या चित्रपटांची रांग!

    अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

    ‘राम सेतु’चे चित्रीकरण सुरु करणार

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले. अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.

    BOLLYWOOD: Akshay Kumar’s mother’s condition critical – admitted to ICU; Actor leaves shooting in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस