• Download App
    मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता मिळणार केंब्रिज बोर्डाचे शिक्षण BMCC schools will get Cambridge board education

    मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता मिळणार केंब्रिज बोर्डाचे शिक्षण

    वृत्तसंस्था

    मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता केंब्रिज बोर्डाचे शिक्षण मिळणार आहे. पालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात करार करण्यात आला. BMCC schools will get Cambridge board education

    महापालिकेच्या किती शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल, याचा येत्या दोन महिन्यांत अभ्यास करून निश्चिसत करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

    लवकरच राज्य सरकारमार्फतही विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

    महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेकडून त्यासाठी शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर साहित्यही मोफत पुरवण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    BMCC schools will get Cambridge board education

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!