विशेष प्रतिनिधी
मुंबई : BMC Elections मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.BMC Elections
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना काँग्रेस आणि वंचित हे ‘नैसर्गिक मित्र’ असल्याचे नमूद केले. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. याआधी नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढलो, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. आज तीच भूमिका पुढे नेण्यासाठी आम्ही ‘समविचारी’ म्हणून अधिकृतपणे एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे, आज काँग्रेसच्या स्थापना दिनीच हा ऐतिहासिक युतीचा योग जुळून आल्याने एका नव्या वैचारिक अध्यायाला सुरुवात झाली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत सांगितले.BMC Elections
भाजपला रोखणे युतीचा मुख्य केंद्रबिंदू
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भारिप सोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असे देखील ते म्हणाले.
वंचित मुंबईत 62 जागा लढणार, काँग्रेसचे काय?
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, काँग्रेस किती जागा लढवणार हे अद्याप सांगण्यात आले नाही, कारण काँग्रेसची शरद पवार गटासोबत जागावाटपाबबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप-शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान
या युतीमुळे मुंबईत आता महायुती, महाविकास आघाडी आणि आता ही तिसरी मोठी ताकद म्हणून समोर आलेली काँग्रेस-वंचित आघाडी यांच्यात चौरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे. आगामी काळात ही नवी आघाडी जागावाटपाचे कोणते सूत्र राबवते आणि भाजपसमोर कोणते आव्हान उभे करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
BMC Elections: Congress and VBA Seal Alliance; 62 Seats For Prakash Ambedkar’s Party
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!
- Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही
- Japan Road Accident : जपानमध्ये 60 हून अधिक गाड्यांची धडक, अनेक गाड्या जळून खाक, 2 ठार, 26 जखमी
- US Snow Storm : अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द, 3 वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी