प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी आयोजिलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला.Blood donation camp in Savarkar smarak got big response from youths in Mumbai
शिबिरासाठी ९८० युवक – युवतींनी नोंदणी केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शिबिरामध्ये ६६२ जण आले. त्यामधील १५० व्यक्ती रक्तदान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरल्या आणि ५१२ लोकांचे रक्तदान यशस्वी झाले.
सकाळी ८.०० वाजल्यापासून रात्री ८.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दादर शिवाजी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्माराकामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याच्या आयोजनात स्मारकाचे प्रमुख रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर अनेक युवक-युवतींनी आयोजन व व्यवस्थेत देखील उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
Blood donation camp in Savarkar smarak got big response from youths in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- पुणे पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाने घेतले स्वतःला पेटवून, चारित्र्य पडताळणीसाठी चकरा मारून वैतागल्याने संताप
- पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळेच दंगली घडल्या, संभाजी ब्रिगेडचे राज ठाकरे यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान
- WATCH : अफगाणी विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत केंद्राशी चर्चा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही
- WATCH : बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे