तसेच या अनेकजण जखमी झाले आहेत.तसेच जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.Blast kills 10 in Karachi, Pakistan; Many were injured
विशेष प्रतिनिधी
कराची : आज (१८ डिसेंबर )पाकिस्तानच्या कराचीमधील शेरशाह पराचा चौक परिसरातील एका इमारतीत भीषण स्फोट झालाय.या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच या अनेकजण जखमी झाले आहेत.तसेच जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
हा स्फोट नेमका कशामुळं झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.जखमी झालेल्या काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.