कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.BJP’s Union Minister Nitin Gadkari infected with corona
विशेष प्रतिनिधी
नागपूर : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेपासून ते अनेक राजकीय नेते आणि अभिनेते-अभिनेत्री यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे.
दरम्यान भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.
गडकरी यांनी ट्विटमध्ये माहिती दिली की , “मला सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार आहे. तसेच मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.
BJP’s Union Minister Nitin Gadkari infected with corona
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा नागरिक आणि पर्यटकांसाठी केला बंद
- कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ , १५ मार्च अंतिम तारीख; सामान्य करदात्यांना सवलत नाही
- यवतमाळमध्ये ९६ किलो चंदन जप्त, एक आरोपी अटकेत
- शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे