प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी अथवा त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी भाजपने आज मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला आहे.BJP’s strike for Nawab Malik’s resignation
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही तर विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने ठाकरे – पवार सरकारला दिला होता. नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
भाजपचा धडक मोर्चा
भायखळा ते आझाद मैदान या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता हा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा या भागातून सुरू झाला. नवाब मलिक राजीनामा द्या, तुरूगांतील मंत्री..पाताळयंत्री, अंडरवर्ल्ड के नवाब कौन ..जवाब दो मलिक अशाप्रकारचे बॅनर भाजपने संपूर्ण मुंबईसह आझाद मैदानात लावले आहेत. भाजपच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होणार असून, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले आहेत.
मलिकांच्या कोठडीत वाढ
ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २१ मार्चपर्यंत मलिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मलिकांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत.
BJP’s strike for Nawab Malik’s resignation
महत्त्वाच्या बातम्या
- युद्ध ताबडतोब थांबवावे, युक्रेनच्या माजी राष्ट्रपतींचे युक्रेनचे विद्यमान राष्ट्रपती झेलन्स्की यांना आवाहन
- ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका
- चंद्राच्या सर्वात बाहेरील आवरणात आढळला ऑर्गन 40 ‘ वायू
- ईव्हीएमवर आरोप केले म्हणजेच अखिलेश यादव यांनी पराभव केला मान्य
- कनाल संध्याकाळी सातनंतर कुणासोबत असतो यांची माहिती घेणे गरजेचे, नितेश रा