राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे. BJP’s ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing anything – Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्राला मदत करायची नाहीच हे केन्द्र सरकारचे धोरण स्पष्ट आहे.राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे.
आज राज्यातील अनेक मंत्र्यांवर सरकारी यंत्रणाचा वापर करून दबाव टाकला जात आहे. सत्ता आहे म्हणून केंद्रातील हे सरकार अस करतंय. भाजप हे देशावर आलेलं संकट त्यांना दूर केलं पाहिजे’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, ‘तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल’ असंही पवार म्हणाले.
शरद पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की केंद्र सरकारने राज्यांना शक्ती द्यायची असते.अडचणीच्या वेळी मदत करायची असते.मात्र भाजपकडून राज्याला मदत होत नाही. याउलट सातत्याने अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
BJP’s ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing anything – Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : दिल्ली उच्च न्यायालय गुप्तचर-सुरक्षा संस्थांना आरटीआय अंतर्गत आणण्याचा निर्णय घेईल
- Csk चा शिलेदार ऋतुराज गायकवाडचे पुण्यातील घरी धूमधडाक्यात आगमन
- सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू