विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Workers पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.BJP Workers
डोंबिवलीतील काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश उर्फ ‘मामा’ पगारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला एडिटेड फोटो शेअर केला होता. ‘माफ करना लडकियों, हम भी ट्रेण्ड मे रहना चाहते है’ असे कॅप्शन देत त्यांनी या व्हिडिओला ‘मी कशाला आरशात पाहू गं’ हे गाणे जोडले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली.BJP Workers
साडी नेसवतानाचा व्हिडिओ व्हायरल
प्रकाश पगारे यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने प्रकाश पगारे यांना मार्केटमध्ये भर रस्त्यावर साडी नेसण्यास लावून त्यांचा जाहीर सत्कार केला. तत्पूर्वी, प्रकाश पगारे यांनी यासाठी विरोध केला, मात्र, भाजपचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. पंतप्रधान मोदींवर टीका करायची तुमची लायकी आहे का? असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना साडी नेसवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पंतप्रधानानांची बदनामी सहन केली जाणार नाही
या कृत्याचा निषेध करताना भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, राजकीय मतभेद असू शकतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांचा असा अपमान करणे चुकीचे आहे. या व्यक्तीने मोदीजींना साडी नेसवली होती. ती पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना साडी नेसवून त्यांचा सत्कार केला. भविष्यात कोणीही भाजपच्या किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्याची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचीही अशीच अवस्था होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे
BJP Workers Honour Congress Leader With Saree
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत + चीन आणि सगळ्या युरोप वर प्रचंड आगपाखड!!
- Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक, 80 लाखांचे इनाम असलेले 2 नक्षली ठार; मृतदेह आणि AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त
- ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- Syria : 58 वर्षांनंतर सीरिया संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होणार; राष्ट्राध्यक्ष अल-शारा न्यूयॉर्कमध्ये पोहोचले