नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी जास्तीत जास्त महापालिका निवडणूक भाजप 1 नंबर वर राहील, यात काही विशेष नाही, त्यापेक्षा भाजप ठाकरे आणि पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, या सवालाच्या उत्तराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.BJP workers expecting to end Thackeray and Pawar dominance in Mumbai and Pune
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात वर्चस्व मिळविले होते. त्यावेळी 27 महापालिकांमध्ये निवडणूक झाली होती. 2026 मध्ये त्यात दोन महापालिकांची भर पडली जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिका तयार झाल्या. त्यांच्याही निवडणुका सध्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्यात. 2017 मध्ये यापैकी भाजपने 13 महापालिका जिंकून इतर पक्षांवर वर्चस्व मिळविले होते. त्यावेळची परिस्थिती पूर्ण भिन्न होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होत्या त्यात भाजप आणि शिवसेनेची युती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरोबर आघाडीत होती. त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिवसेना यांची एकत्रित ताकद बाकी सगळ्या पक्षांपेक्षा प्रचंड मोठी होती 2017 चे निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर भाजपचे नगरसेवक निवडून आले होते.
– 13 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता
2017 मध्ये भाजपने पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, पनवेल, मीरा-भाईंदर, चंद्रपूर, लातूर, सांगली मिरज कुपवाड आणि धुळे अशा 13 महापालिकांमध्ये विजय मिळवला होता. टक्केवारीच्या हिशोबात बोलायचे तर महाराष्ट्रातल्या 45% महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली.
– ठाकरे, पवारांचे वर्चस्व कायमचे मोडायची संधी
पण 2026 मध्ये राजकीय परिस्थिती एवढी बदलली, की भाजप विरुद्ध इतर पक्ष असा प्रचंड मोठा संघर्ष महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उभा राहिला. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्याशी टक्कर घेते आहे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी महायुतीत राहून सुद्धा भाजपशी सवतासुभा मांडला. त्यामुळे भाजपवर मुंबईत ठाकरे बंधू तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे यांच्या विरोधात लढायची वेळ आली. अर्थात खरं म्हणजे ही भाजपला फार मोठी संधी उपलब्ध झाली. एकाच वेळी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महापालिका जिंकताना ठाकरे आणि पवार ब्रँडचे वर्चस्व त्यांच्या त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये पुरते मोडून काढायची दुर्मिळ संधी भाजप समोर आयती चालून आली.
– अजितदादांना वेसण घालायची अपेक्षा
भाजपने मुंबईत जोर लावलाय. भाजपचे नेते ठाकरे बंधूंविरुद्ध आग ओकत आहेत. पण भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ताकद लावली असली, तरी ज्या पद्धतीने अजित पवार भाजपच्या अंगावर गेलेत, त्या पद्धतीने भाजपचे राज्यस्तरावरचे नेते अजित पवारांच्या अंगावर आले नाहीत किंवा त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे भाजपने मुंबई जिंकली आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तडजोड केली, अशी प्रतिमा तयार झाली, तर ती भाजपसाठी हा हानिकारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई बरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड सुद्धा महापालिका जिंकल्या, तर मात्र ठाकरे आणि पवार यांचे वर्चस्व मोडण्यात भाजपचे नेते यशस्वी झाले, हे मान्य करावे लागेल.
BJP workers expecting to end Thackeray and Pawar dominance in Mumbai and Pune
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!
- मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार-निवडणूक आयुक्तांना नोटीस; निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर मागितले उत्तर
- ED raids : I-PAC छापेमारी वाद; ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका; ममता यांच्यावर चौकशी थांबवल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप