‘’वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्य्यांवरून पंतप्रधान नरेंद्र, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankules reply to Uddhav Thackerays criticism
बावनकुळे म्हणाले, ‘’उद्धव ठाकरे, तुम्ही हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उध्वस्त केली. तुमच्या नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत. आणि आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने खडे फोडत आहात. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? हे तपासून बघा.’’
याचबरोबर ‘’आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही. याचा मला सार्थ अभिमान आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही देवेंद्र फडणवीसांची नाही तर तुमची अवस्था आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धव ठाकरे तुम्ही संपवून टाकला.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
याशिवाय ‘’वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी देणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर टीका करु नये आणि तुमच्या सरकारच्या काळातील १०० खोक्यांची वसुली अद्याप जनता विसरलेली नाही, हे ध्यानात घ्या.’’ असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
BJP state president Chandrashekhar Bawankules reply to Uddhav Thackerays criticism
महत्वाच्या बातम्या
- केरळमध्ये पोलिस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा मारा; 14 वर्षांपूर्वी अवयवदानात नियम मोडल्याचा आरोप
- ‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’
- काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा, म्हणाले- माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास
- WATCH : कुस्तीपटू साक्षी मलिकचा व्हिडिओतून नवा दावा, भाजपच्या 2 नेत्यांनी धरणे द्यायला मदत केली, परवानगीही मिळवून दिली