‘’…आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात.’’असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिमला भेट देणार आहेत. दरम्यान, यवतमाळमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा टीका केली. त्या टीकेला भाजपाकडूनही प्रत्त्युत्तर दिले गेले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackerays criticism
२०१९ साली अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता, तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते. तेव्हा अमित शाहांनी शब्द मोडला नसता तर आता भाजपा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री प्रत्येकी अडीच वर्षे राहिला असता, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘’खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाहांसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती, तर नरेंद्र मोदी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही.’’
याशिवाय ‘’युती करताना तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपासोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात.’’ असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
याचबरोबर, ‘’शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही.’’ अशा शब्दांमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी टीका केली आहे.
BJP state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackerays criticism
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती
- WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा
- भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत
- गडचिरोली दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्री शिंदेंना दिसली रस्त्यावर बंद पडलेली रुग्णवाहिका, त्यानंतर…