फडणवीसांवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर उघणाघात
विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत खालच्या पातळीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरात टीका केली. शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशा शब्दांत शरसंधान साधले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून महाराष्ट्र भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार अत्यंत कठोर शब्दात उद्धव ठाकरेंची निंदा करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ‘’आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. उद्धव ठाकरे तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते.’’
याशिवाय ‘’उद्धव ठाकरे, आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला अनेकदा सांभाळून घेतले. तुमचे आणि तुमच्या लहान मुलाचे अक्षरशः लाड केले. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांचे मन पवित्र आहे. त्यांच्यावर तुम्ही कितीही टीका केली तरीही ते विचलित होणार नाहीत. मदत करण्याचा त्यांचा स्वभाव कायम आहे आणि राहील देखील.’’ असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
याचबरोबर, ‘’उद्धव ठाकरे, तुम्हीच कलंकित आहात. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदुत्व गुंडाळून ठेवले. तुम्ही अहंकारी आहात. छोट्या मनाचे आहात. तुमची कीव येते. राजकीय मतभेद असतात पण अशी भाषा कुठलाही राजकीय विरोधक करीत नसतो. देवेंद्र फडणवीसांसारख्या देव माणसावर अशी विकृत टीका करून तुम्ही तुमच्याबद्दल असलेला थोडाबहुत आदर सुद्धा आता संपवून टाकला आहे. तुमची घृणा वाटू लागली आहे.’’ अशा शब्दांमध्ये बावनकुळेंनी टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –
“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे.” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती.
BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- ‘’माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही; महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- उद्धव ठाकरेंनी नागपूरला लागलेला कलंक म्हटल्यावर देवेंद्र फडणवीसांचही ‘कडक’ प्रत्युत्तर, म्हणाले…
- फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले “कलंकीचा कावीळ” म्हणजे काय?? वाचा त्यांच्याच शब्दांत!!