• Download App
    ‘’महाराष्ट्राने असे मुख्यमंत्री बघितले आहेत, ज्यांच्या खिशाला अडीच वर्षे…’’ ; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray

    ‘’महाराष्ट्राने असे मुख्यमंत्री बघितले आहेत, ज्यांच्या खिशाला अडीच वर्षे…’’ ; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली…! असा टोलाही बावनकुळेंनी ठाकरेंना लगावला आहे. 

    विशेष प्रतिनिधी

    कोराडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा एकदा निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे बारसू रिफायनरील करत असलेल्या विरोधावरून बावनकुळे यांनी टीका केली आहे. शिवाय, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सक्षमपणे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे म्हणाले, ‘’महाराष्ट्राने असे मुख्यमंत्री बघितले आहेत, ज्यांच्या खिशाला अडीच वर्षे पेनच नव्हता. आमदारांच्या पत्रावर सह्या होत नव्हत्या. मात्र, शिंदे व फडणवीस हे रस्त्यावर भेटेल तेथे जनतेचे व कार्यकर्त्यांचे समाधान करतात. केंद्र आणि राज्याचा योग्य समन्वय आहे. डबल इंजिन सरकार आहे, योग्य पद्धतीने काम करत आहे.’’

    याचबरोबर बारसू रिफायनरी प्रकल्पास होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधतना, बावनकळे म्हणाले, ‘’सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ उद्धव ठाकरे यांनीच बारसूच्या जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर आता राजकारण करणे योग्य नाही. आता त्यांना एका भूमिकेवर थांबता येत नाही. त्यांनीच घोषणा केली होती की नाणारला नको बारसू येथे निश्चित केलं आहे. सत्ता गेली मात्र अजूनही सत्तेचा बाणा गेला नाही. जनतें ऐकलंच पाहिजे, परंतु तिथे जाऊन राजकारण करणे योग्य नाही. हा प्रकल्प जनतेला समजावून त्यांचं हीत जोपासून केला पाहिजे. आता ते म्हणता तेव्हा सरकारमध्ये होतो म्हणून ती भूमिका होती, आता विरोधी पक्षात आहे म्हणून ही भूमिका आहे. म्हणजेच काय त्यांची अशी निश्चित भूमिकाच नाही. सध्या ते गडबडलेल्या अवस्थेत आहेत.’’

    BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!